7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार इतका वाढणार!
7th Pay Commission Fitment Factor Update: सप्टेंबर अखेरीस सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
नवी दिल्ली : 7th Pay Commission Fitment Factor Update: जर तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी अशा सरकारी कर्मचार्यांसाठी आहे, जे अनेक वर्षांपासून फिटमेंट फॅक्टरमधील बदलाची वाट पाहत आहेत. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच पगार रचनेत मोठा बदल होणार आहे. झी मीडियाला सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर अखेरीस सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
अनेक दिवसानंतर बदल करण्याची मागणी
याशिवाय फिटमेंट फॅक्टरबाबत सरकार सप्टेंबरमध्येच निर्णय घेऊ शकते . यामध्ये बदल होताच कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच त्याचा परिणाम संपूर्ण पगारावर दिसून येईल. फिटमेंट फॅक्टरबाबत सप्टेंबरअखेर बैठक होण्याची शक्यता आहे. हे मान्य झाल्यास फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचार्यांचे मूळ वेतन वाढवले जाईल. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत.
पगारात फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. हे सप्टेंबरमध्ये 3.68 पटीने वाढवले जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल म्हणजे त्याचा तुमच्या पगारावरही परिणाम होईल. त्याआधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली जाते.
2017 मध्ये कर्मचार्यांचे मूळ वेतन
फिटमेंट फॅक्टर 2.57 वरुन 3.68 पर्यंत वाढवून, किमान मूळ वेतन 18 हजार वरुन 26 हजार रुपये होईल. यापूर्वी 2017 मध्ये सरकारने मूळ वेतनात वाढ करुन एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना खूश केले होते. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18 हजार रुपये, तर कमाल वेतन 66,900 रुपये आहे.