अजमेर : अजमेरमध्ये, 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवताना कुटुंबाने एका तरुणाला पकडले. कुटूंबियांनी त्याच्याकडून व्हिडीओ देखील जप्त केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी शेजारी काम करणाऱ्या मजुरावर गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजमेरमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला कुटुंबाने पकडले, त्याच्याकडून तो व्हिडीओही जप्त करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी शेजारी काम करणाऱ्या मजुरावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी सांगितले की, संबधित कुटूंबाच्या शेजारी घराचे काम सुरू आहे. ज्यामध्ये एक मजूर काम करत होता. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, 14 एप्रिल रोजी त्यांची 11 वर्षांची मुलगी बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली तेव्हा तो बाथरूमच्या खिडकीतून त्यांच्या मुलीचा व्हिडीओ बनवू लागला.


यादरम्यान पीडितेची व्हिडीओ बनवणाऱ्या आरोपीवर नजर गेली, त्यानंतर पीडितेने आरडाओरड केल्याने कुटुंबीय घराबाहेर पोहोचले आणि त्यांनी त्या मजूराला पकडले. कुटुंबीयांनी आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला असता त्याच्या फोनमध्ये अनेक व्हिडीओ सापडले. 


पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.