मुंबई : 'मिसाइलमॅन' म्हणून ओळखले जाणारे देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारत रत्नाने सन्मानित असलेले अब्दुल कलाम यांची आज 88 वी जयंती आहे. वैज्ञानिक आणि इंजिनिअर असलेले अब्दुल कलाम हे 11 वे राष्ट्रपती होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवूल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तामिळनाडूमधील रामेश्वरममध्ये झाला आहे. अब्दुल कलाम यांनी वैज्ञानिकाच्या रुपात चार दशक काम केलं. सैन्य मिसाइलमध्ये महत्वाचा विकास त्यांनी केला. त्यांनी आपलं शिक्षण सेंट जोसेफ कॉलेज, तिरूचिरापल्लीमधून केलं. त्यांना 2002 साली भारताचे राष्ट्रपती बनवलं. पाच वर्षानंतर त्यांनी पुन्हा सार्वजनिक क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. 


मच्छीमार कुटुंबातील असलेले अब्दुल कलाम यांना पाच भाऊ आणि पाच बहिणी आहेत. कलाम यांचं बालपण खूप गरिबीत गेलं. त्यांच घर चालवणंच वडिलांनी कठीण होत असे त्यामुळे शिक्षणाकरता अब्दुल कलाम यांनी लहानपणी वर्तमानपत्र देखील विकले आहेत. रेल्वे स्टेशनवर अब्दुल कलाम वर्तमानपत्र विकत असे. 


माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच 27 जुलै 2015 रोजी शिलाँगमध्ये निधन झालं. आयआयएम शिलाँगमध्ये कलाम लेक्चर देण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. 


अब्दुल कलाम यांचे 10 स्फूर्तिदायक विचार 


यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.


तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.


आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.


देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात. 


स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.


एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.


आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल. 


जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.


यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.


स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.


संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.


यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.