25 लाखांच्या लॉटरीपासून सावधान! अमिताभ बच्चन आणि अंबानींच्या नावाने येतायत मेसेज
पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, फोन कॉल, ई-मेल आणि मेसेजवर फसवणूक करणाऱ्यांकडून खोटा दावा केला जात आहे
मुंबई : इंटरनेटचं जग हे असं जग आहे. येथे तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती मिळते. त्यामुळे लोकांसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. परंतु हे लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. त्यामुळे इंटरनेच्या फायद्याबरोबरच आपल्याला त्याचा तोटा देखील आहे. कारण याचाच फायदा घेऊन काही भामटे लोकांना गंडा घालतात.
सध्या लोकांना एक मेसेज येत आहे, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, तुम्ही कौन बनेगा करोडपती (KBC) आणि रिलायन्स जिओ यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ लॉटरीमध्ये 25 लाख जिंकले आहेत.
परंतु असा मेसेज तुम्हाला आला तर जरा सावध राहा. अशा लोभात पडल्यास तुमचे बँक खातेही रिकामी होऊ शकतं.
पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, फोन कॉल, ई-मेल आणि मेसेजवर फसवणूक करणाऱ्यांकडून खोटा दावा केला जात आहे की प्राप्तकर्त्याने 25,00,000 रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ज्याच्या मार्गाने हे भामटे तुम्हाला गंडा घालतात.
अशा लॉटरी घोटाळ्यांपासून सावध रहा. अशा कॉल, मेल आणि मेसेजवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
काही वेळेला हे लोक इतके हुशार असतात की, त्यांच्या फक्त लिंकवरती क्लिक केलं तरी देखील त्यांना तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. मग यासाठी तुम्ही त्यामध्ये काहीही माहिती दिली नाही तरी तुमची फसवणूक होऊ शकते.
अंबानी आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो सोबतच पीआयबी फॅक्ट चेकने एक लिंक आणि फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये फेक मेसेज असून त्यासोबत कौन बनेगा करोडपतीचे होस्ट अमिताभ बच्चन आणि रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा फोटोही वापरण्यात आला आहे.
याशिवाय फेक मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचाही वापर करण्यात आला आहे.
त्याच वेळी, पीआयबी फॅक्ट चेकच्या सोशल मीडिया अकाउंटवर http://cybercelldelhi.in/KBClottery.html ही लिंक देखील शेअर केली गेली आहे. ही लिंक सायबर सेल दिल्लीची आहे. यामध्ये घोटाळ्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हे फसवणूक करणारे लोक अज्ञात नंबरवरून पीडितांना व्हाट्सएप मेसेज पाठवतात. त्यापैकी बहुतेक व्हॉट्सअॅप क्रमांक +92 म्हणजेच पाकिस्तानच्या ISD कोडने सुरू होतात. यानंतर जर या लिंकवर तुम्हील क्लिक केलं, तर तुमच्याशी संपर्क साधून पैसे मागितले जातात.
फसवणूक करणारे केवळ व्हॉट्सऍपद्वारेच संवाद साधण्याचा आग्रह धरतात. ते पीडिताला विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त करतात आणि संपूर्ण फसवणूक अनेक आठवडे आणि महिने चालते. जेव्हा पीडितेने पैसे घेण्याचा आग्रह धरला तेव्हा फसवणूक करणारे कॉल करणे थांबवतात आणि फसवणुकीसाठी वापरले जाणारे व्हॉट्सऍप नंबर ब्लॉक करतात.