मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर जवळ-जवळ दररोज वाढतच चालले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या महिन्याच्या बजेटवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. महागाई इतकी वाढली आहे आणि त्या मानाने आपला पगार मात्र वाढत नाही. त्यामुळे लोकांची चिडचिड होवू लागली आहे. त्यात जर कोणाला समलं की, त्याची यासगळ्या फसवणूक होत आहे. तर मग? अनेक ग्राहकांना हे माहितीही नाही, परंतु पेट्रोल टाकणारे त्यांची सतत फसवणूक करत आहेत. त्यामुळे तुमच्या मेहनतीचे पैसे कुठेही वाया घालवू द्यायचे नसतील तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायलाच हव्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक लोक पेट्रोल पंपावर जाऊन 100, 200 आणि 500 ​रुपयांच्या राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सांगतात. परंतु तुम्हाला माहितीय? तुम्ही मोठी चुक करताय. होय तुम्ही बरोबर ऐकलंत, यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कधीही पेट्रोल भरताना राउंड फिगर न सांगता कोणताही रॅन्डम नंबर सांगा. म्हणजेच तुम्ही राउंड फिगरपेक्षा 10-20 रुपये जास्त पेट्रोल घेऊ शकता.


गाडीची टाकी खाली होईपर्यंत थांबू नका


दुचाकी किंवा कारच्या रिकाम्या टाकीत पेट्रोल भरल्याने ग्राहकाचे नुकसान होते. याचे कारण म्हणजे, तुमच्या कारची किंवा गाडीची टाकी जितकी रिकामी असेल तितकी जास्त हवा त्यात राहील. अशा स्थितीत पेट्रोल भरल्यानंतर हवेमुळे पेट्रोलचे प्रमाण कमी होते किंवा ते लवकर उठून जाते. त्यामुळे गाडीची किमान अर्धी टाकी नेहमी भरलेली ठेवावी.


मीटर सेट करणे


पेट्रोल चोरी करण्यासाठी पंपमालक अनेकदा अगोदरच मीटरमध्ये सेटींग करुन ठेवतात. तज्ञांच्या मते, देशातील अनेक पेट्रोल पंप अजूनही जुन्या तंत्रज्ञानावर चालत आहेत, ज्यामध्ये हेराफेरी करणे खूप सोपे आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरून इंधन भरत, असाल तर मायलेज सतत तपासत राहा, म्हणजे कुठल्या पेट्रोल पंप तुम्हाला कमी पेट्रोल देत असेल, हे तुमच्या लक्षात येईल.


त्यामुळे पेट्रोल नेहमी डिजिटल मीटरच्या पंपावरच भरावे. याचे कारण जुन्या पेट्रोल पंपावरील मशिन्सही जुनी असल्याने या मशीनवर कमी पेट्रोल भरण्याची भीती अधिक आहे.


मीटर शुन्यूवर असल्याचे चेक करणे


ग्राहकांना सांगितले जाते की, मीटर शून्यावर रीसेट केले जात आहे. परंतु अनेकदा हे मीटर शून्यावर आणले जात नाही. त्यामुळे तेल भरताना पेट्रोल पंपाच्या मशीनचे मीटर शून्यावर आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.


- जर पेट्रोलचा मीटर खूप वेगाने चालू असेल, तर समजा काहीतरी गडबड आहे. पेट्रोल पंप कर्मचार्‍यांना मीटरचा वेग सामान्य करण्यासाठी सूचना द्या. कदाचित वेगवान मीटर चालवून तुमची फसवणूक होऊ शकते.


-पेट्रोल पंपाच्या मशिनमध्ये तुम्हाला शून्य दिसले, पण रिडिंग कुठून सुरू झाले हे देखील पाहायला हवे. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, मीटर रीडिंग थेट 10, 15 किंवा 20 अंकांपासून सुरू होते. परंतु मीटर रीडिंग किमान 3 पासून सुरू झाली पाहिजे.


बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या कारमध्ये इंधन भरतात तेव्हा ते गाडीतून खाली उतरत नाहीत. याचा फायदा पेट्रोल पंप कर्मचारी घेतात. पेट्रोल भरताना वाहनातून खाली उतरून मीटरजवळ उभे रहा.


पेट्रोल पंपाच्या पाईपमुळे नुकसान


पेट्रोल पंपावर तेल भरण्याचे पाइप लांब ठेवले जातात. पेट्रोल टाकल्यानंतर, ऑटो कट होताच कर्मचारी तात्काळ वाहनातील नोझल काढतात. अशा परिस्थितीत पाईपमधील उरलेले पेट्रोल पुन्हा टाकीत जेते, त्यामुळे ऑटो कट झाल्यानंतर काही सेकंदांसाठी पेट्रोलचे नोझल तुमच्या वाहनाच्या टाकीमध्ये राहू द्यावे, जेणेकरून पाईपमधील उरलेले पेट्रोलही त्यात जाईल.


पेट्रोल भरताना  पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीला नोजलवरुन हात काढण्यास सांगा. कारण पेट्रोल येताना ते हळूच नोझलचे बटण दाबून ठेवतात, ज्यामुळे पेट्रोलचा स्पीड कमी होतो, ज्यामुळे त्यांना पेट्रोल चोरी करणे सोपे होते.