नवी दिल्ली : २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपलं लष्करी सामर्थ्य दाखवल्यानंतर आता आज बीटिंग दि रिट्रीट सेरिमनी पार पडणार आहे. आज संध्याकाळी नवी दिल्लीतल्या विजय चौकवर हा शानदार सोहळा होणार आहे. त्यामुळे या परिसराच्या आसपास अनेक ठिकाणी वाहन नेण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच अनेक मार्ग वळवण्यात आलेत. बीटिंग द रीट्रीट सेरिमनी हा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय समारंभाचा समारोप सोहळा मानला जातो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायसीना पथवर राष्ट्रपती भवनाच्या समोर या सोहळा पार पडतो. बीटिंग द रिट्रीट सेरेमनी मुख्य रुपात प्रजासत्ताक दिनाचं समापन असतं. बीटिंग रिट्रीट सेरेमनी इंग्रजांच्या काळापासून सुरु आहे. बीटिंग द रिट्रीट दिल्लीच्या विजय चौकात आयोजित केलं जातं. या वेळी राष्ट्रपती भवनला लाईटिंग केली जाते. ही लाईटींग खूपच सुंदर असते.


बीटिंग रिट्रीट सेरेमनचं आयोजन २९ जानेवारीला संध्याकाळी सूर्य मावळताना केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे बँड यावेळी येथे पाहायला मिळतात.


बीटिंग दि रिट्रीट सेरिमनी


1-बीटिंग दि रिट्रीट सेरेमनीचे मुख्य अतिथी हे राष्ट्रपती असतात. 


2- तीन्ही दलाचे जवान एकत्र येत सामूहिक बँड कार्यक्रम सादर करतात आणि परेड ही करतात.


3- रिट्रीटचं बिगुल वाजलं की, बँड मास्‍टर राष्‍ट्रपती यांच्याकडे बँड पुन्हा घेऊन जाण्याची परवानगी मागतात. त्यानंतर सोहळ्याचं समापन होतं.


5- बँड मार्च परत जात असताना 'सारे जहां से अच्‍छा' गाण्याचं संगीत वाजत असतं. 


6- शेवटी राष्ट्रगीत गायलं जातं आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं औपचारिक समापन होतं.


बीटिंग दि रिट्रीट सेरिमनी LIVE