मुंबई : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, ती नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिचा नवरा तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि ते राजा राणीचा संसार करतील. परंतु प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी होतीलच असे नाही. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. आपल्या नवऱ्याकडे पैसे नसल्यामुळे आणि आपल्या नवरा आपल्या इच्छा पूर्ण करत नसल्यामुळे एक महिलेनं असं काही करण्याचा प्लान आखला ज्याचा कोणी विचार देखील केला नसावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर हे प्रकरण राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील आहे. येथे एका महिलेने आपल्या सुंदरतेचा फायदा घेऊन एक प्लान आखला. या महिलेचं नाव आहे रेखा कंवर. ती आणि तिचा नवर तसेच आणखी एका मित्राच्या सहाय्याने एका व्यापाराचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला हनिट्रॅप प्रकरणात अडकवलं.


वास्तविक रेखा पती विक्रम सिंहसोबत झोपडीसारख्या घरात राहत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रेखाला आलिशान जीवन जगायचे होते. परंतु नवऱ्याकडे पैसे नसल्यामुळे तिच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या.


परंतु रेखा दिसायला सुंदर असल्यामुळे तिने आपला नवरा ज्या मार्बल कंपनीत काम करत होता, त्याच कंपनीच्या व्यापाराला आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर शरिरसंबंध बनवताना रेखाने या व्यापाराचा व्हिडीओ काढला.


त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकी रेखाने व्यापाऱ्याला दिली. ज्याला घाबरुन या व्यापाराने 23 लाख रुपये रेखाला दिले होते.


परंतु रेखाची लालसा थांबली नाही आणि तिने आणखी 50 लाखांची मागणी पीडित व्यापाराकडे केली. परंतु यानंतर मात्र रेखा आणि तिचे साथीदार याप्रकरणात पूर्ते अडकले.


नक्की काय घडलं?


नागौर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी मकराना येथे राहणारा मार्बल व्यापारी न सांगता घरातून निघून गेला. 23 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली.


ज्यानंतर पोलिसांना हा व्यापारी सापडला, त्यावेळेस पोलिसांनी व्यापाराची विचारपूस केली असता, त्याने पोलिसांना सगळं प्रकरण सांगितलं.


खरंतर हा व्यापारी आत्महत्या करणार होता. परंतु पोलिसांनी नंतर या तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी महिलेसह ३ जणांना अटक केली


सध्या पोलिसांनी आरोपी रेखा, तिचा मित्र शैतान सिंह आणि पती विक्रम सिंह यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.