BECIL Job: पदवीधरांना थेट मीडियामध्ये नोकरीची संधी, `येथे` पाठवा अर्ज
BECIL Recruitment: बेसिलमध्ये मॉनिटर पदाची भरती केली जाणार आहे.
BECIL Recruitment: तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? तुम्हाला मीडियामध्ये काम करण्याची इच्छा आहे का? मग इतरत्र शोधकाम करण्यात वेळ घालवू नका. कारण ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
बेसिलमध्ये मॉनिटर पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांना संबंधित भाषेचे तसेच कॉम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांना मीडिया/वृत्त क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे.
ठाणे पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! लेखी परीक्षा नाही, पगार किती? जाणून घ्या
अर्ज शुल्क
बेसिल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, माजी सैनिक आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना 885 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना 531 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या
कसा कराल अर्ज?
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? याबद्दल जाणून घेऊया. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.besil.com वर जा. येथे करिअर सेक्शनवर क्लिक करा. आता नोंदणी फॉर्म म्हणजेच ऑनलाइन अर्जावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून नोंदणी करावी लागेल. आता पुढील अर्ज प्रक्रिया करा. मागण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्ज शुल्क भरा. यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. आता भविष्यातील उपयोगासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरु नका.