Crime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Crime News : देशात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये बलात्कार, हत्या यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र या घटनेने तर हद्दच झाली आहे. कारण या घटनेत एका आरोपीने अवघ्या 500 रुपयांसाठी एका चिमुकलीचा बळी घेतला आहे.या घटनेने चिमुकलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परीसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिमुकलीच्या कुटूंबियांनी पोलिसात तक्रार (Police Complaint) दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत आहे.
घटनाक्रम काय
आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी (post mortem)पाठवला होता. तसेच तिच्या कुटूंबियांची ओळख देखील पटली होती.
पोलिसांनी असा लावला आरोपीचा छडा
आरोपी आणि फिर्यादीचे कुटूंब फुटपाथवर (Footpath)राहायचे. या रस्त्यावरूनच चिमुकलीचे अपहरण (Kidnap)झाले होते. त्यामुळे तिच्या हत्येचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. फिर्यादीची दोन वर्षाची मुलगी सोनल 26 डिसेंबरला बेपत्ता झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिच्या फुटपाथवरील घराच्या नजीक असलेले सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासायला सुरुवात केली होती. हे फूटेज तपासत असताना त्यांना फिर्यादीच्या सोबतच फुटपाथवर राहणारा 62 वर्षीय छगन परमार तिला घेऊन जात असल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी त्या छगन परमारची कसून चौकशी (Police Inquiry) केली. या चौकशीत त्याने चिमुकलीच्या हत्येची कबूली दिली.
चिमुकलीची हत्या केली?
चिमुकलीच्या हत्येची कबूली दिल्यानंतर छगन परमार याने हत्येमागचं कारण विचारले असता पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली होती. आरोपी म्हणाला की, काही वर्षांपूर्वी मुलीची आई कांताबेन हिने 5 हजार रुपये उसने दिले होते. त्यापैकी तिने 4500 रुपये परत केले होते,मात्र उर्वरित 500 रूपये ती देत नव्हती. या कारणामुळे दोघांमध्ये सतत भांडणे व्हायची. त्यामुळेच त्याने बदला घेण्या्च्या इराद्याने सोनलचे अपहरण केले होते. आणि अपहरण करून न्यू बंदर रोडजवळील निर्जनस्थळी नेऊन प्लॅस्टिकच्या दोरीने गळा आवळून तिचा खुन केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला होता, अशी कबूली आरोपीने दिली होती.
गुजरातच्या (Gujrat) सौराष्ट्रमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत आता नीलमबाग पोलिसांनी 2 वर्षाच्या मुलीच्या हत्येप्रकरणी छगन परमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करून तूरूंगात टाकले आहे. या प्रकणाचा अधिक तपास सूरू आहे.