अहमदाबाद : सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते अहमदाबादमध्ये दाखल झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतान्याहूंच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेत. दोन्ही पंतप्रधान तिथून अहमदाबादच्या रस्त्यावर रोड शो करतील.


या रोड शोनंतर नेतान्याहू आणि मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधींना साबरमती आश्रमात जाऊन आदरांजली वाहणार आहेत. इथून दोन्ही नेते अहमदाबाद जवळ बांधण्यात आलेल्या एका उद्योग केंद्राचं उद्घाटन करतील. 


याच सेंटरमध्ये पंतप्रधान नेतान्याहू पंतप्रधान मोदींना खारं पाणी गोड करणारी एका जीप भेट देतील. या जिपचं नेमकं काम कसं चालतं याचं प्रत्यक्षिक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवण्यात येईल.


संध्याकाळी मोदी आणि नेतान्याहू यांचसह सांबरकांठा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कृषिसंशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात येणार आहे. 


हे संशोधन केंद्र इस्रायलाच्या मदतीनं उभारण्यात आलं आहे. कृषितंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध आणखी गाढ करण्यात या केंद्राचा मोठा वाटा आहे.