पोस्ट ऑफिसच्या `या` योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम?
Post Office Saving Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत थोडी थोडी बचत केली तर मुदतीनंतर चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या या सुपरहिट स्कीममध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीवर 35 लाख रुपये तुम्हाला मिळतील., जाणून घ्या काय आहे ही स्कीम?
Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते. मात्र, सरकारी बँकेत पैसे ठेवले तर ते अधिक सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. याचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजमध्ये मुदतपूर्तीवर मोठी रक्कम मिळते.
पोस्ट ऑफिस अनेक विशेष योजना आणत आहे. यात ग्राहकांना लाखो रुपयांचा लाभ मिळू शकतो. येथे आम्ही अशा सरकारी योजनेबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी झाल्यावर पोस्टातून पूर्ण 35 लाख रुपये मिळतील. तुम्हालाही जोखीम न उचलता करोडपती बनायचे असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची ही एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी अजूनही गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
1,500 रुपये गुंतवणुकीची ही योजना कशी आहे?
पोस्ट ऑफिसची योजना गुंतवणुकीसाठी चांगली योजना आहे. या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतात. ही योजना इंडिया पोस्टने ग्राहकांसाठी सुरु केली होती. ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करावे लागतील.
पोस्टाच्या या योजनेत तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केली तर आगामी काळात तुम्हाला 31 लाख ते 35 लाख रुपये मिळू शकतात. त्यामुळे बचत केल्याने तुमचा चांगला फायदा होणार आहे.
या योजनेत गुंतवणूक करताना वयाच्या 19 व्या वर्षी केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये बसतो. 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि मॅच्युरिटीवर 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मिळतील.
गुंतवणूक करण्याचे नियम काय आहेत?
- 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करु शकतो.
- या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- या योजनेसाठी प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आहे.
- या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
- ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ती मोडू शकता.
- विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही एक जबरदस्त योजना आहे, ज्यामध्ये दररोज 50 रुपयांची बचत करु शकता. तसेच महिन्यातून एकदा 1500 रुपये जमा करुन, तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी मुदतीवर 35 लाख रुपये मिळतात. तसेच काही अडचणीच्या कालवधीत, लोक मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकतात.