Best Stock : गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवा म्हणून तज्ज्ञांच्यावतीने स्टॉकची निवड करून दिली जाते. जेणे करून त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवी शकतात. जाणून घेऊया अशाच एका क्वालिटी शेअरबाबत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Panasonic Energy मध्ये गुंतवणूकीचा सल्ला
शेअर बाजारातील एक्पर्ट संदीप जैन यांनी झी मीडियाशी केलेल्या विशेष बातचीतमध्ये Panasonic Energy मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, Panasonic Energy India Company Limited चे प्रोडक्ट आपण सर्वांनी वापरले आहेत. कंपनी ड्राय सेल म्हणजेच बॅटरी बनवते. पॅनासोनिक ग्रुप जपानची एक जबरजस्त कंपनी आहे जी होम अप्लायंन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक सामान बनवते.


कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत
कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत.  कंपनी जिंक कार्बन, लिथियम बॅटरी, रिचार्जबल बॅटरी, पेंसिल बॅटरी इत्यादींचे उत्पादन करते. कंपनीवर फक्त 2 कोटींचे कर्ज आहे. प्रमोटर्सच्या होल्डिंगमध्ये 58 टक्के जपानची एमएनसी पॅनासोनिक कॉर्पोरेशनची आहे.


एमएनसीसोबत चर्चीत ब्रॅंड
1972 पासून काम करणाऱ्या या कंपनीचे जूने नाव लखनपाल नॅशनल लिमिटेड होते. त्यानंतर कंपनीचे नाव पॅनासोनिक इंडिया लिमिटेड झाले. कंपनीचे शेअर स्वस्त आहेत. तिमाही निकाल चांगले आहेत. कंपची संपत्ती साधारण 200 ते 225 कोटींची आहे. 


खरेदी करण्याचा सल्ला
सध्याची किंमत CMP 329
लक्ष 350/390
अवधी 6-9 महिने