तूम्ही `या` कारणासाठी घेताय पर्सनल लोन? वेळीच सांभाळा... नाहीतर अंगावर पडेल व्याजाचा डोंगर!
इतर लोनपेक्षा पर्सनल लोन हे महाग पडते कारण त्यावर 20 टक्के व्याजदर असतो.
Personal Loan: सध्या पर्सनल लोनचा उपाय सगळ्यांनाच सोयीस्कर वाटतो. आपल्या जीवनावश्यक गरजांसाठी आपण कर्ज (लोन) घेतो. बँक तूम्हाला ठराविक टक्के लोन देते. ज्याचा वापर आपण आपल्या अत्यावश्यक गरजांसाठी करतो आणि कर्ज घेतल्यावर आपण बँकेला हप्त्यांमध्ये ते परत करतो.
शिक्षणासाठी एज्यूकेशन लोन, घरासाठी होम लोन तर गाडीसाठी कार लोन आपण घेतोच पण वास्तविक इतर लोनपेक्षा पर्सनल लोन हे महाग पडते कारण त्यावर 20 टक्के व्याजदर असतो. काही जण हे लोन न घेण्याची शिफारत करतात कारण त्यातून व्याज भरणेही पुढे कठीण होऊन जाते. तेव्हा अशावेळी कोणत्या गोष्टींसाठी लोन घ्यावे आणि घेऊन नये याची चाचपणी करणे महत्त्वाचे ठरते.
खरंतर तूम्ही लोनसाठी अप्लाय करा किंवा करू नका पण तूम्हाला तूमच्या बँकेकडून पर्सनल लोनसाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही लोनसाठी फोन येतो. जेव्हा तूम्ही पर्सनल लोनसाठी अप्लाय करता तेव्हा त्या प्रक्रियेआधी तूम्हाला प्री-अप्रुव्ड लोनसाठी ऑफर दिली जाते ज्यात तूम्ही तूमचे घर, दागिने, सोने इतरत्र गोष्टी गहाण ठेवण्याची विनंती केली जाते. बरेच लोकं पर्सनल लोनसाठी अप्लाय करतात कारण त्यांना हा मार्ग अधिक सोप्पा वाटतो. पण पर्सनल लोन घेताना टाळावायची गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी?
Personal loan घेऊन कधीच property खरेदी करू नका.
काही लोकांचा असा समज आहे की घर खरेदी करताना डाऊन पेमेंट करण्यासाठी पर्सनल लोन सोयीस्कर ठरते पण कुठल्याही प्रकारे कुठलेच पर्सनल लोन घर खरेदीसाठी स्पेशल फीचरही देत नाही. तेव्हा अशाप्रकारे कर्ज फेडण्यासाठी पर्सनल लोन घेऊ नका कारण पर्सनल लोन हे महाग असते आणि तूम्ही अशा कारणासाठी ते घेतलेत तर तूम्हाला दीर्घकाळ कर्ज भरावे लागेल.
कर्जाच्या सापळ्यात अडकायचे नसेल तर...
अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी personal loan घेतात. कारण त्याचे व्याज खूप महाग आहे. यामुळे त्याचा हप्ताही तुमच्यासाठी अधिक होऊन बसतो. अशा परिस्थितीत एकदाही हप्ता भरणे चुकले तर कर्जाचा बोजजा वाढू शकतो. तसेच तुमचे CIBIL देखील खराब होईल. तुम्ही कर्जाच्या जाळ्यातही अडकू शकता.
personal loan चा वापर कधीच वैयक्तिक फायद्यासाठी करू नका.
तुमचे छंद पूर्ण करण्यासाठी कधीही personal loanघेऊ नका. महागडे मोबाईल आणि महागड्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कधीही personal loan घेऊ नका. तसेच personal loan घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू नका. तुम्ही होमलोन किंवा कार लोन घेतल्यास तुमच्याकडे भांडवल असले तर ते विकून तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता. समजा तुम्ही पर्सनल लोन घेऊन फिरायला गेलात आणि नंतर तुम्हाला ते फेडण्यात अडचणी येऊ शकतात.