Punjab CM : भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, बनले दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री
Bhagwant Mann Oath Ceremony : भगवंत मान हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.
Punjab CM Bhagwant Mann Oath Ceremony : भगवंत मान यांनी आज पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कार्यकाळानुसार ते पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे इतर नेते देखील उपस्थित होते. (Bhagwant Mann sworn in as Punjab chief minister)
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी म्हटलं की, 'पंजाबच्या कानाकोपऱ्यातून भगत सिंग यांच्या गावी आलेल्या लोकांची मी मनापासून आभार मानतो. दिल्लीची कॅबिनेट येथे उपस्थित आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री आले आहेत. पंजाबचे आमदार बसले आहेत. ज्यांनी शानदार विजय मिळवला. येथे असण्याचं खास कारण आहे. हे भगवंत सिंह यांचं गाव आहे. आम आदमी पार्टी त्यांचं स्वप्न पूर्ण करेल. हे गाव माझ्यासाठी नवं नाही. मी येथे अनेकदा आलो आहे. तुम्ही आम्हाला प्रेम दिलं. अनेक जन्म घ्यावे लागतील या प्रेमाचं ऋण फेडण्यासाठी.'
'ज्या लोकांनी मत नाही दिलं. मी त्यांचा देखील मुख्यमंत्री आहे. हे त्यांचं देखील सरकार आहे. आपल्याला कोणत्याकी अंहकारात जायचं नाहीये. जनतेने ठरवलं तर वर नेते आणि ठरवलं तर खाली देखील आणते.'
भगवंत मान (49) हे पंजाबचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याआधी प्रकाश बादल हे 43 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते.