इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूरमधल्या आश्रमामध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर त्यांना इंदूरच्याच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भय्यू महाराजांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. पण त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नसल्याची प्रतिक्रिया इंदूर पोलिसांनी दिली आहे.


भैय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आत्महत्येच्या काही वेळापूर्वीच भय्यू महाराज यांनी ट्विट केलं होतं. मासिक महाशिवरात्रीनिमित्त भक्तांना शुभेच्छा देणारं ट्विट भय्यू महाराजांनी केलं होतं.