इंदूर : इंदूरमध्ये आत्महत्या करणाऱ्या आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांची एक सुसाईड नोट समोर आली आहे. ज्यामध्ये आत्महत्येचं कारण मानसिक तणाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटलं की, मी जात आहे. सोबतच त्यांनी परिवाराची जबाबदारी सांभळण्याची विनंती केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजकारणात देखील त्यांचे अनेकांशी चांगले संबंध होते. आपल्या कार्यातून त्यांनी अनेक अनुयायी त्यांच्याशी जोडले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इंदूरमध्ये मंगळवारी भय्यूजी महाराज यांनी स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली. यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आपल्या लायसेंस रिवॉल्वरने त्यांनी ही आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूसाठी कोणीच जबाबदार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


सुसाईड नोट आणि प्रकरणाची पोलीस चौकशी होत आहे. मध्यप्रदेशमध्ये भय्यू महाराज यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात त्यांने हजारो अनुयायी आहेत.