नवी दिल्ली : ट्रॅफिक समस्येमुळे भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मात्र आता लवकरच या समस्येवरही तोडगा निघणारंय. कारण ड्रोन टॅक्सी सेवेसाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. कशी असेल ही ड्रोन टॅक्सी? पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. (bharat drone mahotsav 2022 central government is preparing to make india a drone hub by 2030)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर ट्रॅफिकला कंटाळला असाल तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता लवकरच या ट्रॅफिकच्या कटकटीतून तुमची आमची सुटका होणारंय. कारण मोदी सरकारनं ड्रोन टॅक्सी सेवेसाठी मोठं पाऊल उचललंय. दिल्लीत शुक्रवारी ड्रोन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 70 हून अधिक ड्रोन्सचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं. मात्र लक्षवेधी ठरली ती ड्रोन टॅक्सी.


या ड्रोन टॅक्सीचं वैशिष्ट्य म्हणजे एका चार्जिंगमध्ये ही टॅक्सी 200 कि.मी. उंचीपर्यंत उडू शकते. या टॅक्सीतून 200 किलोपर्यंत वजन वाहून नेलं जाऊ शकतं. एक पायलट आणि प्रवासी प्रवास करू शकतात. ही ड्रोन टॅक्सी सेवा ओला-उबरपेक्षा थोडी महागडी असेल. मात्र यामुळे वेळेची मोठी बचत होणारंय. 


संपूर्ण भारताला  2030 पर्यंत ड्रोन हब बनवण्याची जय्यत तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या मोहिमेसाठी ड्रोन डेस्टिनेशन या ड्रोन ट्रेनिंग पायलट स्कूलनं कंबर कसलीय. 


ड्रोन टॅक्सी सेवेसाठी देशभरात 150 ठिकाणी ट्रेनिंग स्कूल उघडण्यात येणार आहेत. हे सेंटर देशाच्या कोणत्याही तहसील कार्यालयापासून किमान 6 किलोमीटरच्या अंतरात असतील. त्यानंतर लवकरच कंपनीडून भाडेतत्वावर ड्रोन सेवा सुरू केली जाईल. 


उत्तर काशी, मेघालय, भावनगर, मणिपूर, तेलंगणा, सोनीपत याठिकाणी ड्रोन सेवेचा वापर करण्यात आलाय. औषधं, व्हॅक्सिन तसच खतं आणि बियाणांच्या वाहतुकीसाठी ही सेवा उपयुक्त ठरल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता तो दिवस फार दूर नसेल जेव्हा प्रत्यक्षात ड्रोन टॅक्सी सेवेला सुरूवात होईल.