COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. तणावातून आत्महत्या केल्याचं भैय्यू महाराजांनी या सुसाईड नोटमध्ये म्हंटलं आहे. इंदूरमधल्या आश्रमामध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर त्यांना इंदूरच्याच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 


सुसाईड नोटची दुसरी बाजू उघड


भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. तणावातून आत्महत्या केल्याचं भैय्यू महाराजांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तर आता या सुसाईड नोटची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यात त्यांनी सूर्योदय परिवार आणि त्यांच्या आश्रमाची सर्व जबाबदारी त्यांचा सेवक विनायककडे देण्यास सांगितले आहे.


या व्यक्तीकडे दिली जबाबदारी


माझ्या सर्व आश्रम व त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे.


कौटुंबिक कलहाच्या चर्चेला उधाण


आत्महत्या ही कौटुंबिक कलहातून केल्याचे बोलले जात असताना आपले सर्व व्यवहार सेवकाकडे देऊन या चर्चेला आणखीनच तोंड फुटत आहे. भय्यू महाराजांनी सर्व व्यवहार कुटुंबाकडे सुपूर्त न करता सेवकाकडे देण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.