लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा आझाद यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आझाद समाज पक्षाचा केवळ एकच उमेदवार
यूपी विधानसभा निवडणुकीसाठी आझाद समाज पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त चंद्रशेखर आझाद हे एकच नाव असून पक्षाने त्यांना गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.


समाजवादी पक्षाशी अयशस्वी चर्चा
चंद्रशेखर आझाद यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ४० दिवसांच्या चर्चेनंतर चंद्रशेखर निराश झाले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर अपमानित केल्याचा आरोप केला.