मुंबई : भीमा-कोरेगाव (Bhima-Koregaon) येथे जमावाला हिंसाचारासाठी उद्युक्त केल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि ८२ वर्षीय स्टेन स्वामी ( Stan Swamy) यांच्यासह आठ जणांविरूद्ध शुक्रवारी १ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) कारवाई केली. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वामींना गुरुवारी सायंकाळी रांची येथून अटक करण्यात आली आणि मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांनी २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तथापि, भीमा-कोरेगाव प्रकरणात आपला काही देणे-घेणे नसल्याचे स्वामींचे म्हणणे आहे.



आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आजच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आज आठ जणांविरोधात FIR दाखल केल्याचे वृत्त  एएनआयने दिले आहे.


१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचे मूळ आहे, असा पुणे पोलिसांचा आरोप आहे.  


पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारतद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली. त्यानंतर इतरांनाही अटक करण्यात आली. आज या प्रकरणी NIA ने आज आठ जणांना अटक केली.