सुप्रीम कोर्टाने आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
तीन आठवड्यांमध्ये या दोघांनाही शरण येण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
नवी दिल्ली: भीमा कोरेगाव हिंसा (Bhima Koregaon Case) प्रकरणातील कथित आरोपी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. न्यायालयाने या दोघांना आपले पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. तसेच येत्या तीन आठवड्यांमध्ये या दोघांनाही शरण येण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेला स्थगिती देली होती. ३१ डिसेंबर २०१८ ला पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात हात असल्याच्या आरोपात जानेवारी २०१८ मध्ये गौतम नवलखा आणि इतर चौघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
कोरेगाव- भीमा दंगल भाजप सरकारचे षडयंत्र; शरद पवारांचा गंभीर आरोप
गौतम नवलखा यांनी हा गुन्हा रद्द करून अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत
काही वर्षांपूर्वी छत्तीसगढमध्ये पाच लष्करी जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सरकारने गौतम नवलखा यांची मदत घेतली होती. मात्र, यानंतरच्या काळात नवलखा काश्मीरमध्ये जात असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले होते.