Bjp : भाजपच्या 16 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
तब्बल 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतीलय. यामध्ये कॅबिनेट, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशा जबाबदाऱ्या या आमदारांना मिळाल्या आहेत.
गांधीनगर : गुजरातमध्ये (Gujrat) भाजपने (Bjp) विक्रमी जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता कायम राखलीय. गुजरातच्या इतिहासात भाजपने विक्रमी जागांवर विजय मिळवला. या शानदार विजयानंतर अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार (GUJRAT CABINET EXPANSION) पार पडला. गांधीनगर जवळील ग्राउंडमध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपशासित राज्याचे मु्ख्यमंत्री उपस्थित होते. (bhupendra singh patel take oath as a cm of gujrat and also 16 mla give oath for cabinet and state minister)
भूपेंद्रसिंह पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासह इतर 16 आमदारांनाही लॉटरी लागलीय. तब्बल 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतीलय. यामध्ये कॅबिनेट, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशा जबाबदाऱ्या या आमदारांना मिळाल्या आहेत. भूपेंद्रसिंह पटेल यांच्या मंत्रिमंडळात एकूण 8 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले 2 मंत्र्यांचा समावेश आहे.
कॅबिनेट मंत्री
कनुभाई देसाई, बलवंत सिंह राजपूत, कुंवरजी बावलिया, मुलुभाई बेरा, ऋषिकेश पटेल, राघवजी पटेल, भानुबेन बाबरियाठ आणि कुबेर डिडोर.
राज्यमंत्री
मुकेश पटेल, पुरुषोत्तम सोलंकी, बच्चू भाई खाबड, प्रफुल्ल पानसेरिया, भीखू सिंह परमार आणि कुंवरजी हलपति.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
जगदीश विश्वकर्मा आणि हर्ष सांघवी.
पक्षनिहाय विजयी आमदारांचा आकडा
गुजरातमध्ये एकूण 182 जागांवर भाजपचे 156 उमेदवारांचा विजय झाला. तर काँग्रेसचे 17 तर आपचे 5 उमेदवार जिंकले. भाजपचा गुजरातमधील हा सलग 7 वा विजय ठरलाय.