Driving License Rule | ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल
वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत.
Driving License New Rules : वाहनचालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत. (big changes to the rules for getting a driving license know new rules)
परवान्यासाठी चाचणीची गरज नाही
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात केलेल्या सुधारणेनुसार, आता तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्यची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत.तसेच या नियमांची अंमलबजावणी देखील केली गेली आहे. या निर्णयामुळे लायसन्ससाठी प्रतिक्षा यादीत (Waiting List) असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण
मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO टेस्टची वाट पाहावी लागणार नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नोंदणी करून शकता.
अर्जदाराला ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल. अन् तिथेच टेस्ट द्यावी लागेल. त्यानुसार टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला परवाना देण्यात येईल.
असे आहेत नियम
आता तुम्ही म्हणाल, की नियम इतके शिथिल केलेत म्हंटल्यावर सहजासहजी लायसन्स मिळेल, तर असं नाहीये. यासाठी मंत्रालयाने ड्रायव्हिंग सेंटर स्कूलसाठी काही नियम आणि अटीही घालून दिल्या आहेत. त्यानुसार, यामध्ये ट्रेनिंग सेंटरच्या क्षेत्रफळापासून ते अर्जदाराच्या प्रशिक्षण याचा समावेश आहे. काही समजलं नाही ना?, चला समजून घेऊयात.
दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या मोटार वाहनांच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनिंग स्कूलकडे किमान एक एकर जागा, मध्यम आणि अवजड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे. ही आवश्यक जागा ट्रेनिंग स्कूलकडे आहे की नाही, याची खातरजमा अधिकृत एजेन्सी करेल.
ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा अर्जदार किमान 12 वी बास असावा. त्याला किमान ड्रायव्हिंगचा 5 वर्षांचा अनुभव असायला हवा. त्या इच्छूक उमेदवाराला वाहतूक नियमांची इंत्भूत माहिती असाायला हवी.
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने यासाठी एक अभ्यासक्रम निश्चित केला आहे. हलकी वाहनं चालवण्यासाठीच्या अभ्यासक्रमाचा कालवधी एकूण 4 आठवड्यांचा असेल. यात किमान 29 तास सराव करणं आवश्यक आहे. हा ड्रायव्हिंग ट्रेनिंगचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष आणि लेखी अशा दोन स्वरुपात विभागलेला आहे.
29 तासांच्या अभ्यासक्रमात काय असणार?
29 तासांच्या या एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीपैकी 21 तास हे प्रॅक्टीकल असणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांवर, हायवेवर, चढणीवर गाडी कशी चालवायची, याचा सराव करुन घेतला जाणार आहे. तर उर्वरित 8 तासांमध्ये लेखी अभ्यासक्रम असेल. यात रस्ते नियम, रस्ते सुरक्षा, प्रथमोपचार, अपघातांचे कारण या आणि यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे.