Corona Virus: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
Corona Virus: एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.
Corona Virus: कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या आरोग्य विभागाचं टेन्शन वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात कोविड-19 चे 761 रुग्ण आढळले. शिवाय आकडेवारीनुसार, 12 नवीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील एक्टिव्ह कोरोना प्रकरणं 4,423 वरून 4,334 पर्यंत कमी झाली.
एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांपैकी 5 जण केरळमधील होते. कर्नाटकात चार, महाराष्ट्रात दोन आणि उत्तर प्रदेशात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
JN.1 व्हेरिएंटच्या रूग्णांमध्येही होतेय वाढ
12 राज्यांमध्ये Covid-19 च्या नवीन सब व्हेरिएंट JN.1 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून त्यांची आकडेवारी 619 झाली आहे. कर्नाटकात JN.1 चे 199, केरळमध्ये 148, महाराष्ट्रात 110, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, आंध्र प्रदेशात 30, तामिळनाडूमध्ये 26, दिल्लीत 15, राजस्थानमध्ये चार, तेलंगणा, ओडिशा आणि हरियाणात दोन प्रत्येकी एक रूग्ण असल्याची माहिती आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीसार, कोरोनाचा रिकव्हरी रेट सध्या 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत 220.67 कोटी कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कशी आहे कोरोनाची परिस्थिती
राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी राज्यात एकूण 146 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलीये. यामध्ये 31 रुग्ण हे मुंबई शहरातील असून राज्यात 931 आणि मुंबईत 161 कोरोनाचे एक्टिव्ह रूग्ण असल्याची नोंद आहे.