मुंबई : पीएफ धारकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. तुमच्या खात्यात किती रक्कम आहे हे आत्ताच जाणून घ्या. कारण आता तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ धारकांसाठी ही वाईट बातमी ठरु शकते. मागील वर्षीच्या तुलनेत आता EPFO ने पीएफ बाबत अनेक बदल केले आहेत.


वर्षाच्या सुरुवातीला नॉमिनेशन करण्याची सक्ती कंपनी कडून करण्यात आली होती. आता काही सुविधांमध्ये ही बदल करण्यात आला आहे. 


यंदा पीएफवरील व्याजदर घटवण्यात आला आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.4 टक्के घट झाल्याचं समोर आलं आहे. 2020-21साठी 8.5 टक्के हा व्याजदर होता. आता  सरत्या आर्थिक वर्षात हा दर 8.1 टक्के राहणार आहे.


पीएफ धारकांना आता त्याच्या एकूण रक्कमेवर मिळणारं व्याज हे कमी झालं आहे.