मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, प्रत्येक टोल नाक्यावर आपल्याला वाहनांची लांबच लांब रांग पाहायला मिळते. ज्यापासून सुटका मिळण्यासाठी फास्टॅग आणण्यात आला. परंतु असे असले तरी टोलनाक्यावरील लांबलचक रांगांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. फास्टॅगचा वापर करुन देखील रांगा काही कमी होत नाही, त्यामुळे हे फेल झाल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. दरम्यान, आता अधिक हायटेक होण्याची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी आता ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर) प्रणाली कार्यान्वित होणार आहे. ज्याचा वापर सुरु केल्यानंतर तरी ही समस्या कमी होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. चला याबद्दल जाणून घेऊ या.


वास्तविक, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय एक नवीन संकल्पना घेऊन येत आहे. या अंतर्गत, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) राजस्थानमध्ये असा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवत आहे, जिथे एकही टोल बूथ नसेल. याचा सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, तुमची गाडी माहामार्गावर जितके किलोमीटर चालली, तितकेच पैसे भारावे लागणार आहे.


सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनात लावलेल्या फास्टॅगमधून पैसे कापले जातात. पण नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैसे कापले जातील.


यामध्ये किलोमीटरच्या आधारे लोकांना पैसे मोजावे लागणार असल्याचे मानले जात आहे. या प्रणालीमध्ये महामार्गावर एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन केली जाईल. त्यानंतर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील.


या प्रणालीची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किमी असेल. हा एक्स्प्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार आहे. त्याची लांबी 1224 किमी असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत सुरू होईल.


ते राजस्थान या दोन शहरांना जोडेल. या NH वरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक समर्पित एक्सप्रेस वे मिळेल.