मुंबई : सर्वसामान्यांसाठी खूप मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता 1 नोव्हेंबरपासून  सर्वसामान्यांच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत.  कारण 1 नोव्हेंबरपासून बँकांच्या काही नियमांमध्ये तर बदल होणारच आहे. त्याचबरोबर गॅस सिलेंडर, रेल्वे यांच्या नियमांमध्ये देखील मोठे बदल होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. हे नियम काय असणार आहेत याबद्दल माहिती जाणून घ्या.


1-एलपीजी वितरण प्रणाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात, त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे की, 1 नोव्हेंबर 2021 पासून याशी संबंधित काही नवीन नियम लागू होत आहेत. ज्यांना गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना पुढील महिन्यापासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल.


नवीन नियम असा असेल की, आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.


या नवीन बदलाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) असे नाव देण्यात आले आहे. सिलिंडरची डिलिव्हरी योग्य ग्राहकांपर्यंत व्हावी आणि सिलिंडरचा काळाबाजार थांबता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याआधी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी सुरू केल्याने या गोष्टींना आळा घालणे शक्य होणार नाही.


2-एलपीजी किंमत


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल आणि वायूच्या किमतीत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता, १ नोव्हेंबरला एलपीजी सिलिंडरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. तेल विक्रेते दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून एलपीजीच्या किमती वाढू शकतात, असे ग्राहकांनी गृहीत धरावे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या. यासह जुलैपासून 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजीची किंमत 899.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे.


3-रोख ठेव आणि पैसे काढण्याचे नियम


नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बचत खात्यात एका महिन्यात तीनवेळा पैसे भरता येणार आहेत. तर चारवेळा पैसे काढता येणार आहेत. यापेक्षा जास्त वेळा व्यवहार केल्यास ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहे. हे चार्जेस 40 रुपये प्रती ट्रॅझॅक्शन असू शकतो.


4-रेल्वे वेळापत्रक


भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळेत बदल करणार आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. एका अहवालानुसार, पॅसेंजर गाड्यांसोबतच मालगाड्यांचाही नव्या बदलामध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वेळापत्रक बदलू शकते. त्याचप्रमाणे देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळेत बदल करणे शक्य आहे.


कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर, रेल्वे आपल्या गाड्यांची संख्या वाढवत आहे, परंतु ऑपरेशन अद्याप नियमित नाही. रेल्वे सध्या फक्त विशेष गाड्या चालवत आहे.