पुन्हा निवडणूक! 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं राज्यसभेत दिसणार नवे चेहरे
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक लहानमोठ्या घडामोडी आणि सत्तेमध्येही आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता देशाच्या राजकारणातून एक मोठी माहिती समोर आली आहे.
Elections News : देशातील दोन महत्त्वाच्या सभागृहांपैकी एक असणाऱ्या राज्यसभेचा चेहरा येत्या काही दिवसांत बदलू शकतो. थोडक्यात राज्यसभेवर काही नव्या खासदारांनी नियुक्ती होऊ शकते. मंगळवारीच निवडणूक आयोगानं गुजरात, गोवा आणि पश्चिम बंगालमधून राज्यसभेच्या 10 जागांसाठीची निवडणूक जाहीर केली. त्यामुळं येत्या काळात गुजरातमधील 3, पश्चिम बंगालमधील 6 आणि गुजरातमधील 3 जागांसाठी निवडणुका घेण्यात येतील. यासाठी 13 आणि 24 जुलै रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीचे निकाल / मतमोजणी 24 जुलै रोजी पार पडतील.
दिनेशचंद्र जेमलभाई अनावादिया, सुब्रमण्यम जयशंकर कृष्णस्वामी (भारताचे परराज्यमंत्री), जुगलसिंह मथुरजी लोखंडवाला यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं ही निवडणूक घेतली जाईल. तिथे पश्चिम बंगालमधून डेरेक ओब्रायन, डोला सेन, प्रदीप भट्टाचार्य, सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रे, शांता छेत्री यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळं आता या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.
हेसुद्धा पाहा : Monsoon Updates : पावसामुळं रायगड- पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर दरड; पाहा राज्याच्या कोणत्या भागाला अलर्ट
दरम्यान, एस जयशंकर यांची फेरनिवड होऊ शकते हे आता जवळपास निश्चित झालेलं असताना उर्वरित चेहऱ्यांऐवजी मात्र काही नव्या चेहऱ्यांना जागा दिली जाऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये यासाठी 24 जुलै रोजी मतदान होणार असून, आता या तिन्ही राज्यांमध्ये उमेदवारांच्या नावांवरून चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. इथे निवडणुकीसाठी टीएमसीकडून डोला सेन, डेरेक ओ ब्रायन आणि सुखेंदू राय यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, भाजपच्या वतीनं स्वपन दासगुप्ता आणि अनिर्बान गंगोपाध्याय यांच्या नावांना पसंती दिली जाऊ शकते.