नवी दिल्ली : मांसाहार आणि मद्य घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2 शहरांमध्ये या दोन्ही गोष्टींवर बंदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही. या 2 शहरांना पवित्र शहरांचा दर्जा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीर्थ स्थळ कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे. दोन शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. 


शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथे 285 किमी दूर दमोह जिल्ह्यातील कुंडलपूर इथे जैन समुदायाच्या पंचकल्याणक महोत्सवात याची घोषणा केली. कुंडलपूर आणि  बांदकपूर या दोन्ही शहरांना पवित्र शहरांचा दर्जाही त्यांनी यावेळी दिला. या दोन्ही शहरांमध्ये मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहेय बांदकपूर शहर भगवान शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 


मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू करण्याबाबतही घोषणा केली आहे. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.