भोपाळ : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला एनआयए कोर्टाकडून दिलासा मिळला. साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधातील याचिका एनआयए कोर्टाने फेटाळली. एनआयए कोर्टाच्या या निर्णयामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणाला निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचा अधिकार कोर्टाला नाही, असे न्या. विनोद पडाळकर यांनी म्हटले आहे. तसेच कोणी निवडणूक लढवावी याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा, असेही एनआयए कोर्टाने स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळ येथून उमेदवारी जाहीर केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास मनाई करण्याची मागणी करणारी याचिका स्फोटातील मृताच्या वडिलांनी एनआयए न्यायालयात केली होती. आरोग्याच्या कारणास्तव साध्वीला जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु ती रखरखत्या उन्हात निवडणूक लढवण्यास ठणठणीत असेल तर तिने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला होता. सय्यद अजहर या मृताचे वडील निसार अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली होती.