Chandrayaan Landing Date and Time Update : भारताची  चांद्रयान-3  मोहिम अंतिम टप्प्यात आली आहे. 40 दिवसांच्या प्रवासानंतर  23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. मात्र, चांद्रयान-3 च्या लँडिंग करण्याच्या तारखेमध्ये बदल होवू शकतो (Chandrayaan Landing).  23 नाही तर 27 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिंग करावे लागू शकते. इस्रोच्या अहमदाबाद  स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे डायरेक्टर नीलेश एम देसाई यांनी याबाबतची शक्यता व्यक्त केली आहे. 


23 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिंग करण्याचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांद्रयान 3 मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पहाटे चांद्रयान 3 ने आपली कक्षा आणखी कमी केली आहे. 23 ऑगस्टला आता चांद्रयान हे चंद्राच्या पृष्ठभागावर दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.  चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याची चांद्रयानाची वेळ ठरली आहे. चांद्रयान 3 मोहिमेवर काम करणाऱ्या टीमने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्त्रोने ही वेळ जाहीर केली. 


...तर 27 ऑगस्टला चंद्रावर उतरणार भारताचे तिसरे चांद्रयान


चांद्रयान- 3 चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास 23 ऑगस्टला होणारं लॅडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अहमदाबादच्या स्पेश अ‍ॅप्लिकेशन  सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिलीय. चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी 23 ऑगस्ट रोजी, लँडर मॉड्यूलची कंडीशन आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारे त्या वेळी  चांद्रयान-3  चंद्रावर उतरवणे योग्य आहे की नाही याचा निर्णय घेतला जाईल. जर, कोणताही घटक अनुकूल नसेल तर 27 ऑगस्ट रोजी मॉड्यूल चंद्रावर उतरवू. कोणतीही अडचण न आल्यास  23 ऑगस्ट रोजी नियोजीत वेळेतच  चांद्रयान- 3 च्या लँडरचं चंद्रावर लँडिग केले जाईल. 



भारतासाठी सर्वात मोठा क्षण


याआधी चांद्रयान 2 मोहिमेत चंद्रावर उतरताना ते वेगाने आदळलं होते. यामुळे यावेळेस विशेष खबदारी घेण्यात आली आहे.  14 जुलै 2023 रोजी  श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35  मिनिटांनी भारताचे चांद्रयान- 3 अवकाशात झेपावले. चांद्रयान- 3 च्या लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल तो क्षण भारतासाठी सर्वात मोठा आणि अभिमानाचा क्षण असणार आहे.