सर्जिकल स्ट्राईकपासून उत्तरपूर्वेकडील तणावापर्यंत; पाहा कुठवर आहे CDS रावत यांचा दरारा
भारतीय लष्करानं अनेक कारवायांना पूर्णत्वास नेलं.
नवी दिल्ली : बुधवारी तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये एक अतिशय मोठा आणि तितकाच भीषण अपघात घडला. देशातेच पहिलेय चीफ ऑफ डिफेन्स अर्थात तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत यांना नेणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्याव्यतिक्त त्यांच्या पत्नी आणि इतर काही सेना अधिकारीही होते.
जनरल रावत यांच्या अपघाताची माहिती मिळताच साऱ्या देशातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली.
मुळच्या उत्तराखंडच्या असणाऱ्या सीडीएस रावत यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या सैन्यदलातील सेवेत बऱ्याच यशशिखरांवर उंची गाठली आहे.
CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल
सीडीएस बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानं अनेक कारवायांना पूर्णत्वास नेलं.
उत्तर पूर्व भारतामध्ये त्यांनी दहशतवाद मिटवण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली. जून 2015 मध्ये मणिपूरमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते.
सदर घटनेनंतर 21 पॅरा कमांडोंनी सीमेपलीकडे जात म्यानमारमध्ये असणाऱ्या एनएससीएन या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केलं होतं.
या कारवाईच्या वेळी 21 पॅरा थर्ड कॉप्सच्या अंतर्गत होती. जिथं जनरल रावत कमांडर पदी कार्यरत होते.
29 सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात सर्जिकल स्ट्राईक केला होता.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात लष्करानं दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केले होते. काही दशतवाद्यांचा खात्माही केला. या कारवाईमध्ये जनरल रावत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्याच दिवशी देशाला संबोधित करताना महत्त्वाची घोषणा केली.
तिन्ही संरक्षण दलांमध्ये संतुलन अधिक योग्य करण्यासाठी त्यांनी सीडीएस या पदाची घोषणा केली होती. यानंतरच भारतीय लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी संरक्षण दलातील या सर्वोच्च पदाची जबाबदारी स्वीकारली होती.
चार दशकांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ साईथ विंग, जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2, सैन्य सचिव आणि इंन्स्ट्रक्टर अशा पदांवर काम केलं आहे.