Marriage News : नातेसंबंधांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. याचे अनेक व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. अशातच काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे भाच्यासोबत लग्न लावून दिल्याचे (married woman marry with Nephew) समोर आले होते. एकाच खोलीत भाचा आणि पत्नीला या व्यक्तीने पकडले होते. त्यानंतर त्या मुलाच्या मामीला मामाने त्याच्याकडे सोपवले. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याने दोघांचेही लग्न लावून दिल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) दिसत होते. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ही महिला पुन्हा एकदा आपल्या पतीकडे परतली आहे. पतीनेही तिला सर्व चुका माफ करुन स्विकारल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. बिहारच्या महेशखुंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिकतीया पंचायतीमध्ये हा सर्व प्रकार घडलाय. एका मामीचा आपल्या भाच्यावर जीव जडला होता. यानंतर मामाने आपल्या पत्नीला आपल्या भाच्यासोबत एकाच खोलीत पकडले. त्यानंतर पतीनेच पत्नीचे भाच्यासोबत लग्न लावून दिले. याचा व्हिडीओसुद्धा शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.


काजीचक गावात राहणाऱ्या या व्यक्तीचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. 12 वर्षे होऊनही दोघांना मूलबाळ झाले नाही. गवंडी काम करत असल्याने अनेकदा ही व्यक्ती घरापासून अनेक दिवस दूर राहायची. पाच वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची भाच्यासोबत एका लग्नात ओखळ झाली. यानंतर दोघेही अनेकदा भेटू लागले आणि या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ही गोष्ट कळल्यानंतर पतीने दोघांचेही लग्न लावून दिले.


मात्र लग्नानंतर मामी आणि भाचा त्यांच्या घरी गेल्यानंतर घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला आणि त्यांना घरात घेण्यास नकार दिला. यानंतर भाचा मामीला सोडून फरार झाला. त्यानंतर महिला पुन्हा आपल्या पतीकडे परतली. खूप समजावून सांगितल्यानंतर पतीने तिच्यासोबत राहण्यास होकार दिला. त्यानंतर, पतीने पत्नीला पुन्हा स्वीकारले.