पाटाणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Election 2020 ) मतदान संपले. आता निकालाची प्रतिक्षा आहे. १० नोव्हेंबरला बिहारचा (Bihar) निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी एक्झिट पोल (Bihar Exit Poll) हाती आला आहे. बिहारच्या रणसंग्रामात (Bihar assembly election) कोण बाजी मारणार, याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. महागठबंधनला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या (BJP) एनडीएला यश मिळेल. पण ते बहुमताचा आकडा गाठणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आरजेडीचे (RJD) तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिसून येत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु, या निवडणुकीचे कल काही वेगळेच हाती येण्याची शक्यता आहे, असे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप यांची युती आहे. तर तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि काँग्रेस पक्षानंही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली आहे.


लोक जनशक्ति पार्टीचे चिराग पासवान या निवडणुकीत स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावत आहेत. भाजपने सरकार सत्तेवर आल्यास पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी याआधीच केली आहे. त्यामुळे बिहारची जनता कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकते, याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. येत्या मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar assembly election) मतमोजणी होणार आहे.