Trending News : सीबीएसई बोर्डचे निकाल घोषित झाले आहेत. त्यानंतर बिहारमधील दहावी क्लासची टॉपर श्रीजाची सर्वत्र चर्चा आहे. या टॉपर मुलीची कहाणी तुम्हाला पण भावूक करेल. श्रीजाची कहाणी संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक मुलांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल तिचा आजीने सांगितलं आहे. श्रीजी दहावीत 99.4 टक्के गुण पटकावून बिहार राज्यात ती टॉप आली आहे. तिच्या आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


श्रीजाचं संघर्षमय आयुष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीजाची आजी सांगते की, मुलीच्या निधनानंतर जावयाने श्रीजाला सांभाळण्यास नकार दिला. येवढंच नाही जावयाने दुसरं लग्न केलं. यानंतर श्रीजा तिचा नाना-नानीने लहानचं मोठं केलं. श्रीजाच्या आईचं निधन झालं तेव्हा ती 5 वर्षांची होती. आज ती बिहारची टॉपर म्हणून ओळखली जाते आहे. तिची आजी म्हणते की त्यांचा जावयाने श्रीजाला घरातून बाहेर काढलं हे त्याचं दुर्भाग्य आहे. पण आज हे आमचं सौभाग्य आहे की श्रीजा येवढा मोठ्या यशाची मानकरी आहे. जर जावयाने तिला घराबाहेर काढलं नसतं तर आज त्यांचा घरात हा जल्लोष साजरा झाला असता. 


आता मुलीला भेटायचं आहे वडिलांना


आजी पुढे म्हणते की, आज जावयाला वाटतं असेल की, ज्या मुलीला जावयाने घराबाहेर काढलं ती मुलगी आज आजी-आजोबांचं नाव रोशन करते आहे. श्रीजाच्या आईच्या मृत्यूनंतर जावई कधी घरी आला नाही आणि नाही कधी श्रीजासोबत कुठला संबंध ठेवला. पण आज श्रीजा टॉपर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला भेटण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. 


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर श्रीजाच्या साहस आणि मेहनतीचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सोशल मीडियावरही तिच्या संघर्षाबद्दल हळहळ व्यक्त करत तिच्या यशाबद्दल कौतुक करत आहेत. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणतात ''श्रीजाच्या मेहनतीला सलाम आहे. प्रतिभा कधी संधी शोधत नाही.'' तसंच त्यांनी म्हटलं आहे की, ''जर मी कुठल्याही कामी आलो तर ते माझं सौभाग्य असेल. कोणत्याही मुलाच्या डोक्यावरुन आईची सावली हरवणं हे कुठल्याही धक्कापेक्षा कमी नाही. मात्र श्रीजाने या कमजोरीला आपलं साहस बनवलं. त्यासोबत अशा परिस्थितीत मेहनत, कठोर परिश्रम आणि जिद्दीने हे स्थान मिळवलं आहे.''