डॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या
Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.
Bihar Gang Rape Case: डॉक्टर आणि कम्पाऊंडरचीच नियत फिरल्याने नर्सचा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघे नराधम एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी नर्सची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नर्सचा मृतदेह घटना स्थळापासून 80 किमी दूर नेण्यात आला. पण पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमुळे या घटनेचा छडा लागला आहे. बिहारमधील मोतिहारी येथे सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर हत्येची भीषण घटना समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण एका खासगी नर्सिंग होममध्ये घडले आहे.
खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली. येथे काम करणारी एक परिचारिका दोन दिवसांपासून बेपत्ता होती. नर्सिंग होमलाही दोन दिवस टाळे ठोकण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रुग्णवाहिकेतून नर्सचा मृतदेह काढला बाहेर
नर्सचा मृतदेह रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यात आला. एफआयआरमध्ये मृताच्या आईने नर्सिंग होमच्या ऑपरेटरसह अनेकांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नर्सिंग होम सील करून कंपाउंडरला अटक केल्याची माहिती मृत परिचारिकेच्या आईने दिली आहे.
आईला आपल्या मुलीची माहिती मिळाली
माझी मुलगी घरी परतली नाही तेव्हा मी नर्सिंग होममध्ये गेले. पण तिथे टाळे लावलेले आढळले. मी माझ्या मुलीचा सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यानंतर शुक्रवारी मला एका पोलिसांचा फोन आला. माझ्या मुलीचा मृतदेह मुझफ्फरपूरमधील रुग्णवाहिकेतून सापडला असल्याचे पीडितेच्या आईने सांगितले. आरोपींनी माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली, अस आरोप त्यांनी केला आहे.
नवरा आधीच वारला
माझी मुलगी विधवा असल्याचेही त्यांनी सांगितले. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती माझ्यासोबत राहायची. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. उर्वरित आरोपींनाही पकडण्यासाठी छापेमारी सुरू असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असे सांगण्यात येत आहे.