पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला महागठबंधनने आघाडी घेतली होती, हे चित्र पहिल्या १ ते दीडतासापर्यंत कायम होतं. पण यानंतर पुन्हा एनडीएच्या जागांची आघाडी वाढली आहे. महागठबंधनच्या आघाडीचा वेग जरा मंदावला आहे. यावेळी २४३ जागांमधून २४१ जागांची आघाडी स्पष्ट झाली आहे. यात महागठबंधन ११३  जागांवर तर एनडीए ११९ जागांवर आघाडीवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतीश कुमार मागील १५ वर्षापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. बिहार विधानसभेच्या जास्तच जास्त एक्झिटपोलमध्ये राजद नेता तेजस्वी यादव यांच्या ५ पक्षांच्या महागठबंधनाचा विजय होईल, असा अंदाज लावण्यात आला आहे.


तेजस्वी यादव हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांनी १० लाख युवकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नीतीशकुमार यांनी आपल्या सुशासनाचे दाखले दिले. 



सरकारने केलेल्या कामासाठी नीतीश यांनी जनतेकडून पाठिंबा मागितला. पण ग्राऊंड रियालिटी त्यांना प्रत्येक प्रचाराच्या टप्प्यात लक्षात येत होती. नीतीश यांनी याला शेवटचा डांव असं म्हटल्यानंतर राजकीय पंडितांनी भविष्यवाणी सुरु केली. काहींनी याला राजकीय संन्यास घेण्याची ही तयारी असल्याचं म्हटलं होतं.