पटना : बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Elections) २४३ जागांवर तीन टप्प्यात मतदान झालं. आज या निवडणुकीची मतमोजणी होणार (Bihar Elections Results 2020)असून निकाल काही तासांत आपल्या हाती येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मतदानाच्या पद्धतीत बदल करण्यात आले होते. याचा परिणाम निवडणुकीवर किती झाला हे काही वेळातच स्पष्ट होईल. 


मतदान केंद्रांची संख्या वाढवली 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस कारणामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. ज्यामुळे निकाल हाती येण्यास उशीर होत आहे. यावेळी निवडणुकीत १ लाख ६ हजार ५२६ केंद्र तयार करण्यात आले होते. गेल्यावेळेच्या निवडणुकीच्या तुलनेत हे केंद्र ६३ टक्के अधिक आहेत. २०१५ मध्ये निवडणुकीत ६५ हजार ३६७ मतदान केंद्र होती. मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे ईवीएम (EVM) मशीनची संख्या देखील वाढली. यामुळे मतदान मोजण्यास थोडा उशीर होत आहे. 


वीवीपॅटमुळे होणार उशीर 


मतमोजणीच्या दरम्यान जर कुणी उमेदवार प्रश्न उभे करतात तर ते ईवीएम मशीन सील करून दिली जाते. मतदानाची संख्याची तुलना वीवीपॅट (VVPAT) ने केली जाते. या कारणामुळे निकाल हाती येण्यास उशीर होणार आहे.



अगोदर बॅलट मतपत्रांची होणार मोजली 


मतमोजणीची सुरूवात सकाळी ८ वाजता झाली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात अगोदर बॅलट पेपरमधून दिलेल्या मतदानाची मोजणी होणार. सकाळी ८.१५ वाजता ईवीएममधून गणना सुरू केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच म्हणणं आहे की, ईवीएममधून एका राऊंडची मोजणी करण्याकरता १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. याचा पहिला निकाल हा सकाळी ८.३० वाजता येईल.