Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. एनडीएला सध्या बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. तर महाआघाडीला 100 च्या जवळपास जागांवर आघाडी मिळाली आहे. नितीशकुमार यांचे मुख्यमंत्रिपद जेडीयूने नाही तर भाजपने वाचवले आहे. असे म्हणायला हरकत नाही. कारण बिहार निवडणुकीच्या निकालात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या सर्व 233 जागांच्या ट्रेंडनुसार एनडीए 126 जागांवर आघाडीवर असून महाआघाडी सध्या 105 जागांवर आघाडीवर आहे. बिहार निवडणुकीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला आणि बिहारमध्ये निम्म्यापेक्षा कमी जागा लढवून प्रथमच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनेल. मतमोजणीचा कल पाहता, 110 जागांपैकी भाजपा 73 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीयू 115 जागांपैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय व्हीआयपी 5 आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी एका जागेवर आघाडीवर आहेत.


2010 मधील भाजपची सर्वोत्कृष्ट कामगिरी


2010 च्या निवडणुकीत बिहारच्या राजकारणात भाजपाची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. 2010 च्या निवडणुकीत भाजपने 102 जागा पैकी 91 जागांवर विजय मिळविला. ही भाजपची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. बिहारमध्ये त्यांना कधीही जास्त जागा जिंकल्या नाहीत, परंतु २०१० च्या निवडणुकीत जेडीयूला सर्वाधिक जागा मिळाल्या. जेडीयूने 141 जागांवर लढत 115 जागा जिंकल्या. याआधी बिहारमधील कोणत्याही निवडणुकीत भाजपने कधीही 70 जागांची संख्या ओलांडू शकला नाही.


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 110 जागांपैकी 73 जागांवर आघाडीवर आहे, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या सर्वाधिक जागा आहेत. त्याचवेळी, आरजेडी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. ते 67 जागांवर आघाडीवर आहेत. आरजेडीने 144 जागांसाठी उमेदवार उभे केले होते. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडी 106 जागांवर आघाडीवर आहे.