`पैसे भरा, आवडेल त्या महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाख मिळवा`; `ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस`चा भांडाफोड
Bihar Gang Scam Impregnating Women Job: छापेमारीमध्ये या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हातून निसटला असला तरी या प्रकरमासंदर्भातील बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Bihar Gang Scam Impregnating Women Job: बिहारमधील नवाडामध्ये पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. 'ऑल इंडिया प्रेगनंट जॉब सर्व्हिस' नावाने हे 8 जण एक बोगस कंपनी चालवायचे. या 8 जणांनी फसवणूक केलेल्या लोकांना 13 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवल्याचा दावा केला जात आहे. काही महिलांना त्यांच्या जोडीदारांकडून गरोदर राहण्यास अडचणी येत असल्याने तुम्ही अशा महिलांना मदत करणार असल्याचं सांगत त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं.
799 रुपये नोंदणी फी, वाटेल ती महिला निवडा अन्...
सोशल मीडियावरुन ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. महिलांना गरोदर करण्याच्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला लाखो रुपयांचा मोबदला मिळेल असं या लोकांना सांगितलं जायचं. या लोकांकडून नोंदणी फी म्हणून 799 रुपये घेतले जायचे. त्यांनी एकदा या टोळीबरोबर आपलं नाव नोंदवलं की त्यांना काही फोटो पाठवले जायचे आणि या फोटोंमधील महिलांपैकी तुम्हाला ज्या महिलेला गरोदर करावंसं वाटतंय तिला निवडा असं सांगितलं जायचं. त्यानंतर या इच्छूक लोकांकडून 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत सिक्योरिटी डिपॉझीटच्या नावाखाली पैसे घेतले जायचे. या व्यक्तीने निवडलेली महिला किती आकर्षक आहे यावर या लोकांकडून 5 ते 20 हजारांदरम्यानची रक्कम आकराली जायची.
महिला गरोदर झाली तर 13 लाख मिळतील
या महिलेबरोबर संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिल्यास तुम्हाला 13 लाख रुपये मिळतील असं सांगून या व्यक्तींकडून हे हजारो रुपये गोळा केले जायचे, असं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे. तसेच शरीरसंबंध ठेवल्यानंतर या महिलेला गरोदर करण्यात अपयश आलं तरी तुम्हाला मोबदला म्हणून 5 लाख रुपये मिळतील असं सांगितल्याची माहिती नवाडाचे पोलीस निरीक्षक कल्याण आनंद यांनी सांगितलं.
पोलिसांना छापेमारीदरम्यान काय सापडलं
पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुन्ना कुमार या प्रमुख आरोपीशीसंबंधीत ठिकाणांवर बिहार पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये मुन्ना कुमार पोलिसांच्या हातून निसटला. मात्र या ठिकाणी 8 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. अटक केलेले आरोपी देशभरामध्ये सायबर सिंडेकेट चालवायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी 9 स्मार्टफोन आणि प्रिंटर जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काही लोकांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.