पटना : बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील डेहरी येथे असलेला महिला पोलीस ठाणाचे  (Mahila Thana Dehri) शुक्रवारी लग्न मंडपात रूपांतर झाले. महिला पोलिस स्टेशनमध्ये या प्रेमी जोडप्याने सगळ्यांच्या साक्षीने आपले लग्न पार पाडले. बालपणाच्या प्रेमींनी अखेर एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला पोलीस स्टेशन प्रमुख माधुरी कुमारी यांनी सांगितले की, 'टंड़वा गावचे प्रेमी अभयकांत आणि पडुहार गावची प्रेमीका प्रियंका यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण मुलाचे आणि मुलीचे कुटुंब या लग्नासाठी नव्हते. त्यानंतर या मुलीने महिला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलाला पोलिस ठाण्यात बोलावले, जिथे मुलाने तो लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले."


या दोघांच्या संमतीनंतर तातडीने पोलिस स्टेशन आवारात लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर दोघांनीही हिंदू परंपरेनुसार विधिवत विवाह केला गेला.


लग्नासाठी मुलगी 4 वेळा घरातून पळून गेली


प्रियकर आणि प्रेयसीचे नातेवाईक या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे ही प्रेयसी 4 वेळा तिच्या घरातून पळून गेली होती. पण तिच्या घरातल्यांनी तिला पुन्हा घरी आणले. म्हणून मग  प्रेयसीने या वेळेला सरळ पोलिस स्टेशन गाठले.


त्यानंतर महिला पोलिस स्टेशनमध्ये तिने सगळी कहाणी सांगितल्यानंतर स्टेशनप्रमुख यांच्या समोर या दोघांच्या ही लग्नाची गाठ बांधली गेली.