मुंबई : Cyclone Yaas : चक्रीवादळाने बिहार राज्याला मोठा तडाखा दिला आहे. चक्रीवादळात घरांसह पूल कोसळला आह. या वादळाने आतापर्यंत सात जणांचा बळी घेतला आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने जोरदार पाऊस झाला. पाटणा (Patna) दरभंगा, बांका, मुंगेर, बेगूसराय, गया आणि भोजपूर येथे चक्रीवादळाने एकाचा बळी घेतला आहे. राजधानीत पाटणा आणि वैशालीला जोडणाऱ्या भद्र घाटावरील पिपा पुलाचा जोड रस्ता कोसळला. त्याचवेळी वैशालीच्या राघोपुरात मुसळधार पावसामुळे रुस्तमपूर पीपपुलाची मोठी पडझड झाली आहे. 


आज पावसाचा अंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारीही उत्तर बिहारच्या बर्‍याच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी या चक्रीवादळात बळी गेल्यांच्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबाला 4-4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बेगूसरायमध्ये चक्रीवादळामुळे जखमी झालेल्या चौघांना आणि गया (Gaya)आणि बांका येथे प्रत्येकी एकाला योग्य वैद्यकीय मदत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


हवामान खात्याने (IMD)दिलेल्या इशाऱ्यानुसार बिहारच्या जनतेने सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन नितीशकुमार यांनी केले आहे. त्यांनी आश्वासन दिले की वीज आणि पाणीपुरवठा व वाहनांच्या सुरळीत वाहतुकीची अखंडित पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 


विरोधांकडून जोरदार हल्लाबोल


नितीशकुमार सरकारने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहर पाण्यात बुडविले असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष आरजेडीने एक निवेदन जारी केले. योग्य नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावली आहे, असे आरजेडीने म्हटले आहे.  26 मे रोजी मध्यरात्रीपासून ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बुधवारी झालेल्या जोरदार चक्रीवादळाच्या वादळामुळे यास झारखंड आणि बिहारला प्रभावित झाला (Bihar-Jharkhand effected by Yaas) चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला.


 परिस्थिती हळहळू पूर्वपदावर


येथील हवामान कार्यालयाचे अधिकारी एस. के. मंडल यांच्या मते, कटिहार आणि सारण सारख्या उत्तर बिहार जिल्ह्यात 200 मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस झाला. पाटणा जिल्ह्यात जोरदार वारे वाहू लागल्याने कालपासून 90 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, त्यामुळे राजधानीच्या मुख्य भागासह अनेक भागात जोरदार पाणी साचले आहे. हळूहळू गोष्टी सामान्य होत आहेत. त्याचवेळी, खराब हवामानामुळे गुरुवारी संध्याकाळी हवाई वाहतूक विस्कळीत झाली आणि सकाळी पुन्हा सुरु झाली.