पाटणा :  बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार यांनी बुधवारी साडे सहा वाजता राजभवनात जाऊन राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा दिला. 


या राजीनाम्यानंतर भाजपकडून नितीश कुमार यांचे अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतही नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. 


या बैठकीत ठरले तर भाजपकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुशील मोदी यांचे नाव आघाडीवर आहे.