Sonpur Mela Accident Video : बिहारच्या (Bihar harihar) हरिहर क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठी जत्रा भरली होती. सोनपूर (Sonpur mela) मेला किंवा सोनपूर जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जत्रेमध्ये एकिकडे सर्वणजण आनंदानं आपल्या कुटुंबीयांसोबत, पोराबाळांसोबत त्या क्षणांमध्ये रमलेले असतानाच एक मोठा आवाज झाला आणि जत्रेचं स्वरुपच बदललं. 


जत्रेत एकाएकी काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनपूर जत्रेमध्ये (Sonpur Fair) लोक आकाशपाळण्यात बसून उंचच उंच आभाळापर्यंत जाण्याचा आनंद घेत असतानाच अचानक तो तुटला. झुल्याचा मोठा भाग तुटल्यामुळं त्यामध्ये बसलेले अनेजण जमिनीवर आदळले. सदर अपघातामुळं घटनास्थळी गोंधळ माजला, आक्रोश किंकाळ्या आणि भीतीचं वातावरणच तिथं पाहायला मिळालं. शिवाय झुल्यातून पडलेल्यांना गंभीर दुखापत झाली (Sonpur Accident injuries). झुला तिथंच असणाऱ्या एका वीजेच्या तारेवर पडल्यामुळं तिथंही एकच खळबळ माजली. (bihar sonpur Fair accident Swing Broke Video goes viral)


वाचा : Video :  स्वत: पडला आणि दुसऱ्यालाही पाडलं; बाईकवर बसण्यासाठी धडपडणाऱ्या मद्यपीचा विचित्र पराक्रम



रविवारच्या (Sunday) सुट्टीमुळं गर्दी झाली आणि... 


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत या क्षेत्रामध्ये येण्याजाण्यास बंदी घातली. बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तातडीनं हा निर्णय घेतला गेला. जिथं रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती तिथं स्थानिकांनीच जखमींना उचलून सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली. 


दरम्यान, रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळं जत्रेमध्ये लक्षणीय गर्दी झाली होती. आकाशपाळण्यावर बसणाऱ्यांची संख्याही जास्त होती. झुला अतिशय उंच असल्यामुळं इतक्या वरून पडणाऱ्यांनी गंभीर इजा झाल्या आहेत. तूर्तास हा झुला बंदच ठेवण्यात आला आहे.