बिहार : इंजिनियरिंगचं शिक्षण घेताना अनेकांना प्रतिष्ठीत कंपनीत गलेलठ्ठ पगार देणारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. यामध्ये प्रामुख्याने 'गूगल' ,अ‍ॅपल' सारख्या कंपन्यांकडे जाण्याचा तरूणांचा ओढा असतो. अशीच इच्छा असणार्‍या  आदर्श कुमारचा प्रवास थक्क करणारा आहे.  


बिहारच्या तरूणाचा गूगलमध्ये प्रवेश 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदर्श कुमार हा आयआयटी रूकडीचा मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता. मात्र गूगलमध्ये तो सॉफ़्टवेयर इंजीनियर म्हणून रूजू होणार आहे. लहानपणापासूनच गणित हा त्याचा आवडीचा विषय. बारवीच्या परीक्षेत गणित आणि केमेस्ट्री या विषयात आदर्शला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते.  


सॉफ़्टवेयर प्रोग्रामिंगचं वेड  


मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी असला तरीही त्याचं मन मात्र सॉफ़्टवेयर प्रोग्रामिंगमध्ये रमत होते. गणिताच्या आवडीमुळे प्रोग्रॅमिंग अधिकच सुकर होत गेले. शाळेतही किचकट गणितं सोडवताना वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यासाठी विचार करावा लागत असल्याने त्याचा फायदा कोडिंग आणि सॉफ्टवेअर प्रोगॅमिंगमध्ये झाला.  


गूगलपर्यंत कसा होता प्रवास ? 


इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षाला येईपर्यंत आदर्शला प्रोग्रॅमिंग करण्याबाबतचा आत्मविश्वास चांगला वाढला होता. एका कंपनीमध्ये कॅम्पस सिलेक्शनद्वारा त्याची निवडही झाली होती. मात्र गूगलमध्ये काम करणारा त्याचा एक सिनियरच्या शिफारसीने त्याला गूगलमधील संधीची माहिती मिळाली.  


आदर्शच्या प्रोगॅमिंग स्किल्सवर त्याला मुलाखतीचा पहिला टप्पा पार करणं शक्य असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर सुमारे दोन महिने ऑनलाईन आणि ऑन साईट स्टेज टेस्ट झाल्या, त्यानंतर निवड  झाल्याची माहिती मिळाली. आदर्श ऑगस्ट महिन्यापासून गूगल  म्यूनिख (जर्मनी) ऑफ़िस मध्ये रुजू होणार आहे. 


आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग  


एप्रिल महिन्यात बीजिंगमध्ये झालेल्या प्रोगॅमिंग कॉन्स्टेस्ट एसीएम-आईसीपीसी कॉम्पटिशन मध्ये त्याने सहभाग घेतला होता. जगभरातून स्पर्धक यामध्ये येतात. प्रामुख्याने यामध्ये प्रोगॅमिंगशी निगडीत काही प्रश्नांची उकल करायची असते. या स्पर्धेमध्ये भारताच्या आठ टीम्स सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी आदर्शची टीम दुसर्‍या स्थानी होती. जगभरातील 140 टीम्सपैकी त्याचं स्थान 56वे होते. 


गूगलमध्ये आदर्शला 1 कोटींचं पॅकेज मिळलं आहे. भारतामध्ये एक कोटी फार वाटत असले तरीही जगभरातील इतर लाईफस्टाईलनुसार हे पॅकेज सामान्य असल्याचे त्यांना वाटत आहे.