छपरा : विषारी चहा प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यातील डेरनी ठाणे क्षेत्रात हा प्रकार समोर आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये एका मुलाची स्थिती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार खिरकिया गावात योगेंद्र राय यांच्या घरी त्यांची पत्नी रामकलिया देवी यांनी चहा बनवली होती. 


चहापावडर ऐवजी किटकनाशक 


रामकलियाने चहा पत्ती टाकण्याऐवजी चुकीने किटकनाशक औषध चहात टाकले. चहा प्यायल्यानंतर घरातील चारही लोकांची तब्येत बिघडली.


सर्वांना उपचारासाठी स्थानिक हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. 


मयतांची नावे 


रामकलिया देवी (६५), तिचे शेजारी छठिया देवी (६०) आणि रामकलिया देवीचा नातू अंकूर कुमार हे दगावले आहेत. 


पोलीस तपास 


चहा प्यायल्याने आजारी पडलेल्या १२ वर्षाच्या मुलाला स्थानिक हॉस्पीटलमधून प्राथमिक उपचारानंतर पटना पाठविले. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.