मुंबई: बऱ्याचदा रेल्वे रूळ क्रॉस करताना आपण काळजी घेत नाही. रेल्वे फाटक जास्त वेळ पडून राहातं म्हणून गडबडीनं हे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करते. आजही अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. सारखं फाटक पडत राहातं म्हणून फाटक चुकवण्याच्या गडबडीत बऱ्याचदा गोष्टी जीवावर बेतात. त्याचा विचार कधीही केला जात नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ही चूक करणं किती धोक्याचं ठरेल ते लक्षात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की रेल्वे फाटक पडणार आहे. हे फाटक ओलांडून जाण्यासाठी गाड्या वेगानं जात येत आहेत. फाटक पडत असताना अलर्ट देखील नागरिकांना दिला जातो आहे. याच दरम्यान वेगानं येणारा दुचाकीस्वार नेमका या फाटकात अडकला. रेल्वे रुळ क्रॉस करायच्या नादात वेग वाढला आणि जीवावर बेतता बेतता राहील. 


रेल्वे फाटक बंद झालं आणि वेगानं आलेला बाईकस्वार त्यावर जोरात धडकला. @DoctorAjayita ट्वीटर युझरने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 34 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 हजारहून अधिक लोकांनी ह्या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक युझर्सनी आपलं मत या व्हिडीओबाबत मांडलं आहे. 


काही युझर्सनी असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात उपाययोजना सुचवल्या आहेत. तर एक युझर म्हणाला कधी सुधारणार? बॅरिकेट बंद केल्यानंतरही बऱ्याचदा लोक बाईक त्याच्या खालून घेऊन जातात. त्यामुळे बाईक आणि बाईक चालकाच्या जीवाला तर धोका असतोच पण ट्रेनही वेगात असते. या सगळ्या गोष्टी समजूनही बऱ्याचदा अशा प्रकारच्या चूका लोक करतात असंही युझर म्हणाला आहे.