Viral News: हत्तींच्या कळपासमोरच दोघे बाईकवरुन खाली कोसळले; त्यानंतर हत्ती धावत आले अन्...: थरारक घटना
Viral News: जंगलात माणसांकडून वन्यप्राण्यांना त्रास दिल्या जात असल्याच्या अनेक घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील. आपला जीव वाचवण्यासाठी अनेकदा हे प्राणी माणसांवर हल्ले करतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये हत्तींचा कळप पाहूनच दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळतो. त्यानंतर पुढे काय होतं जाणून घ्या....
Viral News: माणसाने सिमेंटचं जंगल उभारलं आणि प्राण्यांचा अधिवास असणारी जंगलं नष्ट झाली. यामुळेच अनेक शहरांमध्ये हे वन्यप्राणी रस्त्यांवर फिरताना दिसतात. माणसाने त्यांची घरं नष्ट केल्याने घरं आणि अन्नाच्या शोधात अनेकदा हे वन्यप्राणी शोध घेत फिरत असतात. त्यातूनच माणूस आणि प्राण्यांमध्ये संघर्ष होतो. सोशल मीडियावरही (Social Media) असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. दरम्यान, बंगालमधील (Bengal) सिलिगुडीमध्ये (Siliguri) फक्त हत्तींचा कळप पाहूनच घाबरलेले दोघं दुचाकीवरुन कोसळतात. त्यानंतर दोघे जीवाच्या आकांताने पळत सुटतात. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सिलिगुडी येथे घडलेली ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. रस्त्यावरुन नेहमीप्रमाणे वाहनं जात असताना अचानक एक हत्तींचा कळप रस्त्यावर येतो. यावेळी लोक चारचाकी, दुचाकीवरुन प्रवास कर होते. हत्तींचा कळप रस्ता ओलांडणार असतो तितक्यात तेथून जाणारे दुचाकीस्वार त्यांना पाहतात. ते घाबरतात आणि याची गडबडीत रस्त्याच्या शेजारी कोसळतात.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दुचाकीस्वार रस्त्यावरुन जात असताना हत्तींचा कळप अचानक समोर येतो. हत्ती आपल्यावर हल्ला करतील या भीतीने दुचाकीस्वार वेगाने बाईक पळवतो. पण यादरम्यान त्यांची बाईक रस्त्याच्या कडेला जाते आणि नियंत्रण जाऊन दोघेही खाली कोसळतात. यानंतर हत्ती आपल्यावर हल्ला करतील या भीतीने दोघेही उठून पळत सुटतात. दरम्यान हत्ती त्यांच्यावर कोणताही हल्ला करत नाहीत. पण जर ते वेळेत उठून पळाले नसते तर कदाचित हत्तींनी त्यांना चिरडलं असतं.
हत्तींच्या कळपात त्यांची पिल्लंही होती. दुचाकीस्वारांमध्ये हत्तींची किती भीती हे त्यांच्या डोळ्यातून दिसत होतं.
दरम्यान, वनविभागाने या रस्त्याने जाताना प्राण्यांना कोणताही त्रास देऊ नका असं आवाहन केलं आहे. घटना घडली तो हत्तींचा परिसर आहे.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने हत्तीसमोर जाऊन आपला जीव धोक्यात घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर गाडी थांबवत ही व्यक्ती हत्तीसमोर जात हात जोडते. दरम्यान यावेळी हत्ती घाबरतो आणि दोन पावलं मागे जातो. हत्ती सोंडेने माती उडवून त्या व्यक्तीला दूर करण्याचाही प्रयत्न करतो. पण त्यानंतर तो थांबत नाही आणि हात जोडतो. यादरम्यान पाठ केल्यानंतर हत्ती त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो. पण तरीही तो तेथून हालत नाही.
IFS अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला असून हे आत्महत्येसारखे होते असं म्हटलं आहे.