Biporjoy Cyclone Location : बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान,  या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान विभागानुसार (IMD)पुढील 6 तासांमध्ये अत्यंत तीव्र चक्रीवादळात Biparjoy बदलण्याची शक्यता आहे. मात्र, ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पोरबंदर किनार्‍यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याचा अंदाज आहे, परंतु 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, अत्यंत तीव्र चक्रीवादळ 'बिपरजॉय' पुढील 12 तासांत तीव्र चक्री वादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.


आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असतील, त्यांनी किनारी परतावे.  या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


बिपरजॉय चक्रीवादळ कुठे पोहोचले?


हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकण्यापूर्वी हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. अहमदाबाद हवामान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या पोरबंदरपासून 600 किमी दूर आहे. जसजसे ते पुढे जाईल तसतसे पोर्ट सिग्नल अलर्ट त्यानुसार बदलतील.


बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार?


अंदाजानुसार, यावेळी बिपजॉय चक्रीवादळ पोरबंदरपासून 200-300 किमी आणि कच्छमधील नलियापासून 200 किमी अंतरावर जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता नाही. मच्छिमारांना पुढील 5 दिवस म्हणजे 15 जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मासेमारीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.


बिपरजॉय कुठे चालले आहे?




 चक्रीवादळ बिपरजॉय उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत त्याचा वेग उत्तर-पूर्वेकडे बदलण्याची शक्यता आहे. यानंतर चक्रीवादळाची दिशा उत्तर-वायव्य दिशेकडे असेल. 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: सौराष्ट्र-कच्छ भागात वाऱ्याचा वेग जोरदार असण्याची शक्यता आहे.