मुंबई : जवळपास ६ हून अधिक राज्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) चा धोका वाढला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अलर्ट जाहीर केला आहे. तेथेच केंद्र सरकारने देखील या मुद्याला गंभीरतेने पाहत कंट्रोल रुम (Control Room) तयार केलं आहे. या कंट्रोल रुमच्या माध्यमातून बर्ड फ्लूबाधित राज्यांशी संपर्क साधणं सहज उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटाच्या काळात (Coronavirus Crisis) देशात बर्ड फ्लूचा धोका समोर येत आहे. मध्य प्रदेशात बर्ड फ्लूचा सर्वाधित धोका आहे. मध्य प्रदेशात शेकडोंच्या संख्याने कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा व्हायरस सापडला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिस्थिती पाहता तात्काळ बैठक बोलावली आहे. 


राज्यात पॉल्ट्री फॉर्ममधून पक्ष्यांचे सँपल घेतले जात होते. याबाबत राज्य सरकार लवकरात लवकर नियम जाहीर करणार आहेत. 




केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा व्हायरस सापडल्यानंतर दिल्लीत कंट्रोल रुमची स्थापना करण्यात येत आहे.